Savitribai Phule Kishori Samridhi Yojana: मित्रानो, झारखंड राज्यात विविध योजना झारखंड सरकार राबवत आहे. महिलांसाठी, मुलींसाठी, पुरुषांसाठी, तसेच शेतकऱ्यांसाठी आणि अपंगांसाठी सुद्धा झारखंड सरकार विविध योजना राबवत आहे. आज आपण अशा एका योजने बद्दल जाणून घेणार आहोत, जी योजना झारखंड सरकार कडून मुलींसाठी राबववण्यात येत आहे.
या योजनेमध्ये झारखंड सरकार मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या खात्यात ४०,००० रुपये देणार आहेत. सरकार हि राक्कर विविध टप्प्यांमध्ये देणार आहे. मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना व्यतिरिक्त या योजने बाबत सरकारचा असा उद्देश आहे कि, राज्यात चाललेल्या भ्रूण हत्या, बाल विवाह, इत्यादी. सारख्या चुकीच्या प्रथा मोडण्यात याव्या आणि मुलीना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा आणि त्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करता यावे असा आहे.
Savitribai Phule Kishori Samridhi Yojana 2025 अंतर्गत इयत्ता 8 वी. ते 10 वी. च्या विद्यार्थिनींसाठी सरकार ४०,००० रुपये त्यांच्या बँक खात्यात देणार आहे. या योजनेचा लाभ मागील 2024-2025 मध्ये लाखो विद्यार्थिनीनी घेतला आहे. या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम हि वेगवेगळ्या स्वरुपात आणि विविध टप्प्यांत मिळणार आहे. या योजने अंतर्गत इयत्ता 8 वी. व 9 वी. मधील शिकणाऱ्या विद्यार्थिनीन साठी 2500 रुपये, तर इयत्ता 10 वी. 11 वी. व 12 वी. मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीन साठी 5000 रुपये मिळणार आहेत. तसेच मुलीचे 18 वय पूर्ण झाल्या नंतर मुलीना सरकारकडून सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना अंतर्गत तब्बल 20,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील मुलीना उच्चशिक्षण घेण्यास आर्थिक मदत होणार आहे.
तुम्हीही या योजनेचा लाभ त्वरित घ्या आणि तुमच्या मुलींच्या शिक्षांच्या अडचणी दूर करा. या योजनेचा फॉर्म हा अतिशय सोपा आहे. आपण पुढे पाहणारच आहोत कि सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना 2025 साठी कोण-कोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना साठी अर्ज कसा करायचा. संपूर्ण माहिती या लेखात तुम्हाला मिळेल.
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धि योजना म्हणजे काय? आणि सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धि योजना काय आहे?
सामाजिक सुरक्षा आणि महिला आणि बाल विकास विभाग, झारखंड या विभागाने झारखंड राज्यातील मुलीना उच्चशिक्षण घेता यावे व अर्थिक लाभ मिळावा म्हणून सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना हि राबवण्याचे ठरविले आहे. ही योजना झारखंड राज्यात ऑगस्ट, 2019 मध्ये सुरवात झालेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे झारखंड राज्यातील गरीब व मागासवर्गीय मुलीना तथा विद्यार्थिनीना आर्थिक मदत मिळावी आणि उच्चशिक्षण घेऊन त्यांच्या आयुष्यात प्रगती व्हावी असा आहे. या योजनेंतर्गत झारखंड राज्यात तब्बल 37 ते 40 लाख मुलीना अथवा विद्यार्थीनीना आर्थिक सहायता मिळणार आहे. त्यामुळे मुलीना त्यांच्या शिक्षणासाठी तडजोड करण्याची आवश्यकता पडणार नाही.
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना 2025 थोडक्यात माहिती / तपशील
योजनेचे नाव | सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना |
सुरवात कोणी केली? (राज्य सरकार) | झारखंड राज्य सरकार |
योजना कधी सुरु झाली? | ऑगस्ट, 2019 |
कोणत्या विभाग मार्फत योजना सुरु झाली? | सामाजिक सुरक्षा आणि महिला आणि बाल विकास विभाग |
लाभार्थी कोण असेल? | राज्यातील गरीब, गरजू व मागासवर्गीय विद्यार्थिनी |
मुख्य उद्देश्य | गरीब, गरजू व मागासवर्गीय विद्यार्थिनी उच्चशिक्षण घेण्यास आर्थिक मदत |
लाभार्थींना सरकार तर्फे दिली जाणारी रक्कम | रु. 40,000/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील |
अर्ज करण्यासाठी अधिकृत पत्ता | https://savitribaipksy.jharkhand.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 0651 2400757, 0651 2223544 |
हे पण वाचा : GDP कसा मोजला जातो आणि GDP म्हणजे काय | What is GDP meaning in Marathi 2024
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेचे उद्देश
- गरीब घरातील मुलीना अथवा विद्यार्थीनीना उच्च-शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी.
- विद्यार्थीनीना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे.
- गरीब घरातील, गरजू व मागासवर्गीय मुलीना अथवा विद्यार्थीनीना आत्मनिर्भर बनविणे.
- बालविवाह रोकणे व मुलींबद्दल ची सकारात्मक विचारसरणी लोकांच्या मनात निर्माण करणे.
- राज्यात चाललेल्या भ्रूण हत्या रोकणे.
- गरीब घरातील मुलीना अथवा विद्यार्थीनीना उच्च-शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवून भविष्यात रागाती करणे.
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेची रक्कम कशी मिळेल?
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजने अंतर्गत इयत्ता 8 वी. ते 12 वी. पर्यंतच्या विद्यार्थीनीना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत वेगवेगळ्या वर्ग साठी वेगवेगळी रक्कम झारखंड सरकारने ठरविली आहे आणि त्यानुसार विद्यार्थीनीना त्याचा आर्थिक मदत मिळणार आहे. जशी जशी मुलगी मोठी होत जाईल आणि पुढच्या वर्गात जाईल तस-तशी लाभाची रक्कमही वाढत जाईल.
इयत्ता | आर्थिक मदत / लाभ (रक्कम) |
---|---|
आठवी (8 वी.) | रु. 2,500/- |
नववी (9 वी.) | रु. 2,500/- |
दहावी (10 वी.) | रु. 5,000/- |
अकरावी (11 वी.) | रु. 5,000/- |
बारावी (12 वी.) | रु. 5,000/- |
अठरा-एकोणवीस वर्ष पूर्ण (18-19 वर्ष) (लग्न झाले नाही तर) | रु. 20,000/- |
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेची पात्रता
- सुरवातीला ही योजना फक्त 2 मुलींसाठी लागू होती, परंतु आता सरकारने ही योजना सर्व मुलींसाठी लागू केली आहे.
- अर्जदार फक्त झारखंड राज्याची रहिवाशी असलेली पाहिजे.
- अर्जदार शेवटच्या लाभापार्येंत 18 ते 19 वर्षाची असणे गरजेचे आहे.
- मुलगी अथवा विद्यार्थिनी गरीब, गरजू आणि मागासवर्गीय घरातील असणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी अर्जदार (मुलगी अथवा विद्यार्थी) इयत्ता 8 वी. ते 12 वी. या वर्गातील विद्यार्थिनी असायला हवी.
- अर्जदाराचे आई किवा वडील केंद्र राज्याच्या सरकारी नौकरी मधून निवृत्त झालेले नसावे.
- विद्यार्थीनी झारखंड मधील सरकारी शाळेत किवा मान्यताप्राप्त खाजगी शाळेत शिकणारी असावी.
- अर्जदाराचे आई किवा वडील इनकम टैक्स मर्यादेत असावे.
- लाभार्थी च्या परिवार कडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे बँक खाते उघडलेले असावे. ई.
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेची कागदपत्रे
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. चला तर बघूया त्यासाठी कोण-कोणती कागदात्रे लागणार आहेत,
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- सेल्फ डिक्लेरेशन
हे पण वाचा: पेन ड्राईव्ह म्हणजे काय आणि पेन ड्राईव्ह कसे कार्य करते?
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना साठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन पद्धत
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना साठी अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करु शकतो. आपण बघूया कि ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करता येईल,
STEP-1:
- सर्वप्रथम तुम्हाला सरकारने दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल.
- तिथे गेल्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
- त्यासाठी तुम्हाला उजव्या साइड ला दिलेल्या लॉगीन हे बटन दाबावे लागेल, तिथे ड्रोप डाउन मेनू मध्ये बेनिफिशरी लॉगीन हे बटन दाबावे लागेल.
- त्यानंतर रजिस्टर नाऊ या बटनावर क्लिक करा, तिथे तुम्हाला एक फॉर्म ओपेन होईल.
- त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा, पासवर्ड, ई. सर्व माहिती भरून घ्या.
- त्यानंतर रजिस्टर नाऊ या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

STEP-2:
- आता तुम्ही परत मेन वेबसाईट वर जा आणि लॉगीन करा.
- लॉगीन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा युझर आयडी म्हणून टाका आणि त्यानंतर पासवर्ड टाका.
- त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि नंतर लॉगीन या बटनावर क्लिक करून तुम्ही लॉगीन करू शकता.

STEP-3:
- तुम्ही लॉगीन केल्यानंतर तुमच्या समोर सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना चा डॅशबोर्ड उघडेल.
- त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला अप्लाई ऑनलाइन या बतानावर क्लिक करुन अप्लाई या बटनावर क्लिक करावे लागेल.
- तिथे तुम्हाला एक पेज ओपेन होईल ज्यात पात्रता संबंधित माहिती दिलेली असेल, तुम्हाला टी माहिती वाचून चेक बॉक्स वर क्लिक करून Accept या बटनावर क्लिक करावे लागेल.

- आता तुम्हाला तिथे फॉर्म भरण्यासाठी पेज ओपेन झालेले दिसेल.
- तुम्ही उमेदवाराची योग्य ती संपूर्ण माहिती तिथे भरून सेव & नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल.
- तुम्ही तो रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे सेव करून ठेवू शकता.
STEP-4:
- पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथे नवीन फॉर्म भरण्यासाठी विचारण्यात येईल.
- तो फॉर्म नीट वाचून भरावा आणि त्यानंतर सेव & नेक्स्ट या बटनावर क्लिक करा.
- तो फॉर्म भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला गो टू अपलोड डॉक्युमेंट्स आणि रीव्हीव डीटेल्स असे 2 बटन दिसतील.
- तुम्हाला जर मागील सर्व माहिती परत तपासायची असेल तर रीव्हीव डीटेल्स या बटनावर क्लिक करून तपासू शकता किवा गो टू अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करून पुढील माहिती तुम्ही भरू शकता.
- तुमचे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला गो टू अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करावे लागेल.
- तिथे तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील. कोणत्याही कागदपत्रांची साईझ हि 2MB पेक्षा जास्त नसावी.
- डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती परत एकदा बघायची किवा तपासायची असेल तर तुम्ही प्रीव्हिव अँप्लिकेशन या बटनावर क्लिक करू शकता.
- सर्व माहिती बरोबर असल्यास फायनल सबमिट या बटनावर क्लिक करून तुमची माहिती सेव करा.

ऑफलाइन पद्धत:
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना साठी अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करु शकतो. आपण बघूया कि ऑफलाइन पद्धतीने कसा अर्ज करता येईल,
तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अरें मधील ब्लोक ऑफिस ला जावे लागेल किवा शाळेतील मुख्याधापाकाना भेटावे लागेल. ते तुम्हाला सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना चा अर्ज देतील तो तुम्ही त्यांना भरून तिथे जमा करू शकता.
हे पण वाचा : WhatsApp वर चॅट्स, स्टेटस, कॉल अनम्यूट कसे करायचे?
सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना 2025 फॉर्म PDF:
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्जाची PDF डाऊनलोड करू शकतात.
Application Form / सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना 2025 फॉर्म: येथे क्लिक करा