2025 मध्ये ग्रामीण भागातील 5 सर्वात फायदेशीर व्यवसाय कोणते? | ग्रामीण भागात करता येणारे व्यवसाय कोणते? | 5 Most Profitable Business Ideas In Rural Areas Information In Marathi

Join whatsapp channel Join Now
Join Telegram channel Join Now

ग्रामीण भागात कोणता व्यवसाय करावा? हा सर्रास कानावर येणारा प्रश्न आहे.

जर तुम्हाला ही हाच प्रश्न पडत असेल किंवा तुम्हीही इच्छुक असाल व्यवसाय करण्यास, पण खेडे गावात किवा ग्रामीण भागात कोणते व्यवसाय करावे हे माहिती नाहीत, किती गुंतवणूक लागेल, मार्केटिंग स्किल्स माहिती नाहीत, यापूर्वीचा कोणताही अनुभव नाही असे अनेक प्रश्न आज आपल्या समोर आहे. ग्रामीण भागात राहत असल्या मुळे किंवा बाहेरच्या लोकांशी व बाजारपेठांशी कमी संपर्क असल्या अभावी हे प्रश्न नवीन समस्या बनून आज समोर येत आहेत. आपण ग्रामीण भागातील 5 सर्वात फायदेशीर व्यवसाय या लेखात बघणार आहोत.

तुम्हाला तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरात सुरू करता येतील असे भरपूर व्यवसाय आहेत परतू व्यवसाय कसा निवडावा किवा व्यवसाय कसा करावा हे लोकांना समजत नाही. तुमच गाव बाजारपेठेचे ठिकाण असेल किंवा परिसरातील एक महत्त्वाचं ठिकाण असेल किंवा तुमच्या परिसरात असा एखाद गाव असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही खूप सारे स्थानिक स्थरावर चालणारे रिटेल किंवा सर्व्हिस आधारित व्यवसाय सुरू करू शकता.

सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे ह्या पोस्ट च्या मार्फत आपल्याला देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि आशा आहे की तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचाल.

ग्रामीण भागात केले जाणारे 5 सर्वात फायदेशीर व्यवसाय

1) मधमाशी पाळणे :

मध अधिक उपयुक्त असे उत्पादन आहे. प्राचीन काळापासून मधाचा उपयोग होत आहे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये मधाचे खूप महत्त्व आपल्याला पाहायला मिळते. शिवाय कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मध बहुतेक सर्व लोकं खरेदी करतातच. तर असे हे उपयोगी मध आपल्याला मधमाशी मुळेच मिळते.

मध पासून नफा व्यतिरिक्त, चांगली अतिरिक्त कमाई हि मधमाशी ची निवड आणते. अश्या ह्या लहान व्यवसायासाठी कमी गुंतवणुकीची गरज लागते. तरीही मधमाशी पाळणे हा एक नफा मिळवून देणारा उत्तम व्यवसाय ठरू शकतो.

2) डाळ मिल :

हा व्यवसाय केवळ ग्रामीण भागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही करता येतो. दाळमिल मध्ये तूर, हरभरा, उडीद, मसूर, वटाणे किंवा कुठल्या प्रकारचे द्विदल धान्य घेऊन तुम्ही त्याच्या पासून डाळ तयार करू शकतात आणि एकदा का ही प्रक्रिया झाली की ह्याच वाटलेल्या डाळी शेजारच्या बाजारपेठेचा अंदाज घेऊन तिथे तुम्ही सहज रित्या विकू शकता. या व्यातरीक्त तुम्ही ह्या डाळी ऑनलाईन सुद्धा विकू शकता.

आजूबाजूचे शेतकरी असतील कोणी तूर उत्पादक असेल, कोणी हरभरा उत्पादन असतील, कोणी उडीद उत्पादक किंवा कुठल्या प्रकारचे उत्पादन करत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही तो कच्चा माल मागू शकतात. यानंतर तुम्ही हाच कच्चामाल घेऊन तुम्ही तुमच्या मिल मध्ये यावर प्रक्रिया करू शकता. या नंतर तुम्हाला तयार झालेल्या नवीन मालाची विक्री करायची आहे आणि चांगल्या प्रकारचा नफा मिळवायचा आहे.

हे पण वाचा : GDP कसा मोजला जातो आणि GDP म्हणजे काय | What is GDP meaning in Marathi 2024

3) मसाला मेकिंग :

जर तुम्हाला माहिती नसेल तर माहीत करून घ्या की, भारत-पाकिस्तान, सौदी अरब, मॉरिशियस, आणि दक्षिण आफ्रिका या देशातील दररोजच्या जेवणात मसाल्यांचे पदार्थ किंवा मसाला युक्त काळीमिरी, सुके, खोबरे, तेज पान विलायची त्यानंतर सुकलेल्या लाल मिरच्या, नागकेशर, खसखस, जायपत्री, चक्रफुल, मसाल्यांचे पदार्थ आहेत. हेच पदार्थ वापरण्यात येतात आणि त्या मसाल्यांना भाजी मध्ये टाकून चविष्ट भाजी बनवितात आणि एक उत्तम प्रकारचा स्वाद त्या भाजीला येतो. भाजी मध्ये मसाला नसेल तर भाजी चवदार लागत नाही म्हणूनच भाजीत मसाला असणे गरजेचे आहे. या व्यातरीक्त तुम्ही हे मसाले ऑनलाईन सुद्धा विकू शकता.

भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला निर्यात करणारा देश आहे. तर असा हा मसाला मेकिंग उद्योग व्यवसाय तुम्ही मसाला मेकिंग मशीन घेऊन सुरू करू शकतात. हा व्यवसाय अगदी कमीत कमी गुंतवणूक आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा आहे.  अद्रक लसूण कांदा यांची पेस्ट तयार करणे हा एक लघु उद्योग होऊ शकतो. तुम्ही तुमचे हेच पदार्थ वेगवेगळ्या परिसरात, गावात, शहरात, राज्यात किंवा कोणत्याही देशात विकू शकता.

4) चिप्स मेकिंग :

संपूर्ण जगात चिप्स हा प्रकार किती प्रसिद्ध आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये. चिप्स हा जगातील सर्वाधिक प्रसिद्ध स्नॅक्स पैकी एक आहे हे मानायला सुद्धा काहीही हरकत नाही.  चिप्स ह्या मध्ये सुद्धा खूप प्रकार आहे. केवळ बटाटा चिप्स हा फक्त एक चिप्स च प्रकार नसून खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि फ्लेवर चे चिप्स आपण सर्वांनी चाखले आहेत.

याच्यामध्ये चिप्स मध्ये बटाटा पासून तयार होणारे चिप्स असतील किंवा केळी पासून तयार होणारे चिप्स, हे सर्वत्र खूप प्रसिद्ध आहेत तसेच खूप आवडीने खाल्ले जातात. या व्यातरीक्त तुम्ही हे चिप्स ऑनलाईन सुद्धा विकू शकता.

या व्यवसायासाठी चिप्स मेकिंग मशीन मिळते, त्याद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात अगदी कमी श्रेणी वर करू शकता. सुरुवातील कमी गुंतवणूक करून तुम्ही ह्या व्यासायला भव्य दिव्य करून तुम्ही विचार सुद्धा केला नसेल एवढा नफा मिळवू शकता.

5) पोहा मिल :

पोहा आपल्या भारतामध्ये नाश्ता साठी सगळ्यात जास्त सुप्रसिद्ध आहे. तुम्ही आम्ही किती तरी वेळा याची चव घेतलीच असणार आहे. तसेच या पासून बनवण्यात येणाऱ्या प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आपल्या आवडीच्या आहेतच. तुम्ही पोहा ऑनलाईन सुद्धा विकू शकता.

पोहा मिल उद्योग व्यवसाय असा व्यवसाय आहे की तुम्ही तो ग्रामीण भागातून सुद्धा सुरू करू शकता. जर तुमच्याकडे कच्चा माल उपलब्ध असेल तर तुम्ही त्याच मालापासून चुरमुरे म्हणजेच मुरमुरे सुद्धा तयार करू शकता. त्याचबरोबर ते दगडी पोहे किंवा कागदी पोहे, नायलॉन चे पोहे, मक्याचे पोहे असे विविध अनेक प्रकारचे पोहे तुम्ही तयार करू शकतात आणि मार्केटमध्ये  विक्री करू शकतात. या व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे उत्पन्न विक्रेत्याला मिळू शकते. हा सुद्धा एक लघु उद्योग म्हणून सुरू करून तुम्ही या उद्योगाला मोठे करू शकता.

हे पण वाचा : WhatsApp वर चॅट्स, स्टेटस, कॉल अनम्यूट कसे करायचे? | How to Unmute Chats, Status, Calls on WhatsApp in Marathi

निष्कर्ष:

आशा आहे कि तुम्हाला ग्रामीण भागातील 5 सर्वात फायदेशीर व्यवसाय कोण-कोणते आहेत ते आपण बघितले आहे. आपल्या भारता मध्ये छोट्या छोट्या व्यावसायामधून खूप चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवू शकतात. तुम्ही या सर्व व्यवसाय मधून तुम्हाला जो आवडेल तो व्यवसाय निवडून सुरु करू शकतात आणि चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकतात.

Join whatsapp channel Join Now
Join Telegram channel Join Now

Leave a comment